30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रआता महाराष्ट्रात शाळा भरणार 'गुगल क्लासरूम'वर; Googleची मोफत सेवा

आता महाराष्ट्रात शाळा भरणार ‘गुगल क्लासरूम’वर; Googleची मोफत सेवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुगल क्लासरूम ही सेवा गुगल तर्फे शालेय शिक्षण विभागाला मोफत पुरविण्यास तयार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिली.

दीक्षा या केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या ॲपवर महाराष्ट्राने तयार केलेल्या ई साहित्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्यासाठीचा आराखडा विभागाकडे तयार आहे. यात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सणांच्या सुट्ट्या कमी कराव्यात. तसेच येणारे शैक्षणिक सत्र मे पर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कोरोनामुळेच नव्हे तर बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मात्र हे करत असतांना विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची तयारी करुन घेणे आवश्यक आहे, अशा सूचना डॉ. माशेलकर यांनी यावेळी दिल्या. टिव्ही रेडिओ सोबतच टोल फ्री क्रमांक देऊन टेलिफोन या माध्यमाचाही शिक्षण पद्धतीमध्ये समावेश करण्याबाबत त्यांनी सुचविले.

Read More  वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले 50 हजारांचे सोने केले परत

ऑनलाईन तसेच नव्या माध्यमांचा वापर करतांना शिक्षकांचे काम वाढणार आहे शिक्षकांना तेव्हा बदलणाऱ्या माध्यमांना हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची पदे भरण्यात यावीत, अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांना पुन्हा शिक्षणाच्या कामासाठी नेमावे, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली.

विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी डॉ. अनिल पाटील, लातुरचे प्रा. अनिरुद्ध जाधव, नागपुरचे रविंद्र फडणवीस, औरंगाबादचे रजनीकांत गरुड, विवेक सावंत, वसंत घुईकेडकर आदिंनी या बैठकीत आपल्या सूचना मांडल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या