हिंगोली/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाने शंभरी गाठली असली तरी ८५ रुग्ण एसआरपीएफचे जवान ठणठणीत झाले. मात्र हे शहरीभागातील असल्याने चिंतेचे कारण नव्हते. मात्र आता हिंगोली तालुक्यातील भिरडा येथे मुंबई येथून जिल्ह्यात परतलेल्या १ व्यक्तींस कोविड-१९ ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. बाधीत रुग्ण वसमत येथील बाधीत असलेल्या रुग्णांसोबत मुंबई येथे कामाला होता.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण १०० व्यक्तींना कोविड-१९ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून त्यातील ८५ व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. दरम्यान हिंगोली तालुक्यातील भिरडा येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने गावात दुपारी आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. गावात कंटेनमेंट झोनचा अमल करण्यात आला आहे. ११०२ लोकसंख्या असलेल्या गावात अंगणवाडी ताई आणि आशा वर्करच्या मदतीने दररोज बाधीत रुग्ण कोणाच्या संपर्कात आला त्याच क्वारंटाईन केले जाणार आहे़ तसेच गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण गाव सील करण्यात आले असून नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन करण्यात आले आहे.
Read More बंदीविरोधात उमर अकमलने केले अपील
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
भिरडा गाव कंटेनमेंट झोन घोषित
हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा या गावात कोविड-१९ चा रुग्ण आढळून आला असून कोरोना आजाराचा इतरत्र प्रादुर्भाव होवू नये याकरीता हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या कंटेनमेंट झोनच्या क्षेत्रात भिरडा गाव, कलगाव पश्चिम बाजूस १़५ कि.मी., पारडा गावाच्या पुर्व बाजूस २ कि.मी., माळहिवरा गावाच्या दक्षिण बाजूस २.५ कि.मी. आणि बफर झोन बासंबा गावाच्या उत्तर बाजूस ४ कि.मी. हे क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (४५ आॅफ १८६०) च्या कलम १८८ व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.