हिंगोली/प्रतिनिधी
राज्यसरकारच्या लॉकडाऊन मधील शिथीलतेने दररोज मजुरांचे लोंढे ग्रामीण भागात परतत आहेत. यामुळे आता मुंबईहून परतणारे मजूरच कोरोनाचे वाहक ठरत आहेत. आज जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वसमतचे ५ व १ औंढा ताालुक्यातील आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा आकडा शंभराच्या पार गेला आहे. मात्र यात ८९ जणांनी कोरोनाला हरवले आहे. बहुतांश राज्यराखीव दलातील जवानाचा समावेश होता. मात्र आता कोरोनाचे वाहक मुंबईहुन ग्रामीन भागात परतत असलेले मजूर ठरत आहेत. परिणामी ग्रामीण भागात धोका वाढत आहे. आज ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात वसमत तालूक्यात ५ तर औंढा तालूक्यात १ परतलेल्या मजुरांचा समावेश आहे. या सर्व बाधीत रुग्णांना वसमत आणि औंढा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
आता जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत असे आरोग्य विभागाने कळविले आहे. दरम्यान कोरोना विरोधातील लढ्यात अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर सोशल डिस्टन्सीगचे पालन करावे, मास्क शिवाय घराबाहेर पडू नये तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी केले आहे.
लॉकडाऊनची शिथिलता सामान्यांच्या जिवावर
केंद्र सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. परिणामी तिन लॉकडाऊनमध्ये कोरोनाची लागण राज्य राखीव दलाच्या मुंबई आणी मालेगाव मधून परतलेल्या जवाना पुरती मर्यादीत होती. आणी तिसºया लॉकडाऊनच्या शेवटी हिंगोलीची ग्रिन झोनच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता मिळाली आता दररोज मजुरांचे लोंढे ग्रामीण भागाकडे कुच करीत आहेत. यातच ग्रिन झोनच्या वाटचालीचे टरबुज फुटले. आज ग्रामीण भागात झपाट्याने वाढणा-या संसर्ग सामान्य जिवावर उठत आहे