23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रउदय सामंत जाणार शिंदे गटात, गुवाहाटीला रवाना

उदय सामंत जाणार शिंदे गटात, गुवाहाटीला रवाना

एकमत ऑनलाईन

मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामंत हे गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे.

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल असतानाच रविवारी (ता. 26) त्यांचा दुरध्वनी नॉटरीचेबल आल्याचे वृत्त धडकले. त्यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्कही साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या काही समर्थकांमध्ये मात्र मंत्री सामंत गुवाहटीला पोचल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली.

दरम्यान शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी मंत्री सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटूंबीयांशीही चर्चा केली होती. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या