कॅलिफोर्निया : सध्या धकाधकीच्या जीवनात माणसाचा आपलाच आपल्यावर ताबा राहिलेला नाही. या धावपळीच्या जगण्यात आपण काय खात आहे, कसे जगत आहे? याहीकडे लक्ष द्यायला मानवाला वेळ नाही. आपण अन्न कमी रासायनिक खतेच जास्त खात आहोत. त्यामुळे विचित्र आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मानसिक आजारांचे तर खूप मोठे प्रमाण आहे. मात्र आता संशोधकांनी यावर अफलातून उपाय शोधून काढला आहे. मानसिक आजार बरे करण्यासाठी मानवी मेंदूमध्ये रोबोट (यंत्रमानव) पाठवण्यावर सध्या काम सुरू आहे.
एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या कथेसारखी वाटावी अशी ही बाब आहे. मानसिक आजार बरे करण्यासाठी मानवी मेंदूमध्ये रोबोट पाठवण्यावर सध्या काम सुरू आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बायोनॉट लॅब्स ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन वर्षांत या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवांवर क्लिनिकल चाचण्याही केल्या जातील.
इंजेक्शनद्वारे रोबोट पाठवले जातील
मायक्रोरोबोट हे बुलेटसारखे लहान धातूचे सिलेंडर आहेत, जे पूर्व-प्रोग्राम केलेल्या मार्गाचे अनुसरण करतात. बायोनॉट लॅबचे सीईओ मायकेल श्पिगेलमाकर यांच्या म्हणण्यानुसार, हे रोबोट इतके लहान आहेत की ते इंजेक्शनच्या मदतीने मानवी शरीरात टाकले जाऊ शकतात. हे नंतर चुंबकाच्या मदतीने मेंदूकडे निर्देशित केले जाऊ शकतात. तर मायकेल म्हणतात की, मायक्रोरोबोटचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे १९९६ मधील फॅन्टास्टिक व्हॉयेज चित्रपट, ज्यामध्ये शास्त्रज्ञांची एक टीम मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या दुरुस्त करण्यासाठी सूक्ष्म स्पेसशिपमध्ये प्रवास करते.
मायक्रोरोबोटचे कार्य करण्याची पद्धत
बायोनॉट लॅब्सने जर्मनीच्या मॅक्स प्लँक संशोधन संस्थेच्या सहकार्याने रोबोट विकसित केले आहेत. रोबोटना मेंदूकडे पाठवण्यासाठी त्यांनी अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल ऊर्जेऐवजी चुंबकीय ऊर्जा वापरली, कारण त्यामुळे शरीराला इजा होत नाही. ही चुंबकीय कॉइल रुग्णाच्या डोक्यावर बसवून ती संगणकाशी जोडली गेली. त्याच्या मदतीने रोबोटला योग्य दिशेने हलवता येते आणि मेंदूचा प्रभावित भाग निश्चित करता येतो. हे पूर्ण उपकरण कोठेही सहजपणे नेले जाऊ शकते आणि ते एमआरआय स्कॅनपेक्षा १० ते १०० पट कमी वीज वापरते.
मायक्रोरोबोटमुळे मोठे आजार बरे होतील
न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, मायक्रोरोबोट डँडी-वॉकर सिंड्रोमसारखा भयानक मानसिक आजार बरा करण्यास सक्षम असतील. हा एक जन्मजात आजार आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये द्रव भरू लागतो आणि गोल्फ बॉलच्या आकारापर्यंतच्या सिस्ट्स देखील वाढू लागतात. त्यामुळे मेंदूवर दबाव वाढतो. परिणामी मन आणि शरीराचा समतोल साधता येत नाही. मायक्रोरोबोटचा वापर कर्करोगाच्या गाठी, अपस्मार, पार्किन्सन्स रोग आणि मेंदूतील स्ट्रोकवर उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
तंत्रज्ञानाच्या प्राण्यांवरील चाचण्या सुरक्षित
मायकेल सांगतात की, त्यांच्या कंपनीने हे तंत्रज्ञान मेंढ्या आणि डुकरांसारख्या मोठ्या प्राण्यांवर वापरले आहे. चाचणी परिणाम दर्शविते की तंत्रज्ञान मानवांसाठी देखील सुरक्षित आहे. बेनॉट लॅब्जला गेल्या वर्षी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन कडून मान्यता मिळाली आहे.