25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home आता तंबाखू विक्रीच्या दुकानांसमोरही रांगा;तंबाखू घेण्यासाठी लोकांची गर्दी

आता तंबाखू विक्रीच्या दुकानांसमोरही रांगा;तंबाखू घेण्यासाठी लोकांची गर्दी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू असला तरी तिसऱ्या टप्प्यातही सरकारने अनेक गोष्टींना सुट दिली होती. दरम्यान, त्या कालावधीत मद्यविक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मद्यविक्री करणाऱ्या दुकांनांसमोर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात तंबाखूच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. यानंतर तंबाखू विक्रीच्या दुकानांसमोरही पाहायला मिळत आहेत. सूरतमधील तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणीही लोक तासनतास उभे असल्याचे दिसून आले.

Read More  10 ते 12 मृत्युमुखी : पश्चिम बंगाल, ओदिशात अम्फान चक्रीवादळाचा कहर

करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना तंबाखू मिळाला नाही. परंतु दुकाने सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा मी जिवंत झालो अअसे वाटत आहे. एका तासापेक्षा अधिक वेळ मी या रांगेत उभा होतो, अशी प्रतिक्रिया तंबाखू घेण्यासाठी आलेल्या एकाने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तर तंबाखूची दुकाने बंद केल्यामुळे अनेकांना समस्या निर्माण झाली असावी. लॉकडाउनच्या कालावधीत मला इतके फोन येत होते की मला माझा फोन बंद करावा लागला. काही लोकांना माझ्या घराचा पत्ता मिळाला तर ते माझ्या घरापर्यंतही पोहोचले होते, असे एका तंबाखू विक्रेत्याने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या