24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआता वीज पडण्याअगोदर सूचना मिळणार

आता वीज पडण्याअगोदर सूचना मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. विशेषत: शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता भारत सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयाने एक मोबाईल अ‍ॅप आणले आहे. दामिनी अ‍ॅप असे या नवीन अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला आता वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणार आहे. त्यामुळे अ‍ॅप आता वरदान ठरणार आहे.

मान्सून कालावधीत विशेषत: जुन व जुलै या महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते. वीज पडून जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी अ‍ॅप तयार केले आहे. हे दामिनी प वीज पडण्याची पूर्वसूचना आपल्या मोबाइलवर देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व विशेषत: शेतक-यांना वीज पडून होणा-या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी प वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेतमजूर, शेतक-यांना मोठा दिलासा
आता राज्य शासनाने दामिनी अ‍ॅप शासनस्तरावर मान्य करून सर्व अधिकारी, फिल्ड वर्कर्स, शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी डाऊनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे. हे अ‍ॅप किती प्रभावी ठरेल हे आगामी काळात समजणार आहे. दामिनी अ‍ॅपचा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतक-यांना वरदान ठरणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

आपत्तीमुळे होणा-या मृत्यू प्रमाण एक तृतीयांश मृत्यू विजेमुळे
वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण गमावतात. दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींंमुळे होणा-या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. ब-याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

वीज नेमकी कशी तयार होते?
जमिनीलगत वाहणारी हवा गरम झाल्यावर हलकी होते आणि वर वर जाऊ लागते. पण ती हवा वर जात असताना थंड होत जाते. त्यामुळे हवेत असलेले बाष्प थंड होऊ लागते, त्याचे ढगात रुपांतर होते. मग ते ढग इतके थंड होतात की त्याचे लहान लहान
बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते.

– ही हवा अजून थंड झाल्यावर हिमकण तयार होतात. त्यामुळे हे वजनदार हिमकण वेगाने खालच्या दिशेने येऊ लागतात. त्याचवेळी गरम वाफ वरच्या दिशेने जात असते. हवा वजनदार झाल्याने ती खालच्या दिशेने वाहू लागते.

– या खालून वर आणि वरुन खाली येणा-या हवेतील बाष्प आणि हिमकणांमध्ये घर्षण होते. सतत घर्षणामुळे तिथे फुग्याप्रमाणे ऋण विद्युतभार तयार होतो. आणि जमिनीपासून वर जाणारे बाष्प हे धन विद्युतभारीत (पॉझीटिव्ह चार्ज) असतात. म्हणजेच तेथे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वीज तयार होते. आणि त्यातून तीव्र प्रकाश तयार होतो. ज्याला आपण वीज म्हणतो.

– तसेच जमिनीवर वीज पाडण्याचे देखील तेच कारण आहे. जमीन ही धन विद्युतभारीत असते. ऋण भार आणि धन भार एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सर्वात जवळचा वाहक पाहून वीज त्याठिकाणी पडते. वीज पडताना विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो. कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या