22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआता देशभरात प्रवास करण्यासाठी ई-पास मिळणार

आता देशभरात प्रवास करण्यासाठी ई-पास मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप पाहून केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन 4.0 अंतर्गत सरकारने अनेक सवलती दिल्या आहेत. केंद्र सरकारने एक नवीन वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात प्रवास करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

https://serviceonline.gov.in/epass/ ही वेबसाईट राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर 17 राज्यांमध्ये प्रवासकरण्यासाठी ई-परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे. लॉकडाऊनमध्ये मिळणारा ई पास हा विशिष्ट श्रेणींमध्येच मिळणार आहे. या श्रेणींमध्ये विद्यार्थी, आवश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचारी, पर्यटक, यात्रेकरू, आपत्कालीन/वैद्यकीय कारणासाठी प्रवास आणि विवाह यांचा समावेश आहे.

Read More  दिल्लीत सार्वजनीक वाहतुकीला परवानगी

अनिवार्य माहिती द्यावी लागेल
वेबसाईटवरील माहितीनुसार, एखादी व्यक्ती किंवा ग्रुप या सेवेचा वापर करून प्रवासी पाससाठी अर्ज करू शकणार आहे. ज्यांना या सेवेद्वारे अर्ज करायचा आहे, त्यांना अनिवार्य माहिती द्यावी लागेल. ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीदेखील सादर कराव्या लागतील. याशिवाय ओटीपी पडताळणीसाठी एक सक्रिय मोबाइल नंबर देखील आवश्यक आहे.

 सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी ठेवावी लागणार
वेबसाईटवर अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास संदर्भ क्रमांक मिळेल. प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या पास वर अर्जदाराचे नाव, पत्ता, वैधता आणि क्यूआर कोड असणार आहे. प्रवासी पास मिळाल्यानंतर अर्जदाराने प्रवास करताना या पासची सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी ठेवावी लागणार आहे. जेणेकरुन जेव्हा सुरक्षा कर्मचारी ई-पासबद्दल विचारतील तेव्हा तो दाखवायला हवा.

Read More  रोहित शर्मा बायकोसाठी भावूक

लॉकडाऊन 4 मध्ये फक्त स्पेशल ट्रेन, पार्सल आणि मालगाड्या धावणार!
देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कामगार विशेष, इतर विशेष गाड्या, पार्सल सेवा आणि फक्त मालगाड्या सुरू राहणार असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 30 जून पर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या