23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण : हवामान खात्याने वर्तवला अंदाज

मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण : हवामान खात्याने वर्तवला अंदाज

एकमत ऑनलाईन

काही दिवसात मान्सून अंदमानच्या उर्वरित बेटांवर सुद्धा दाखल होण्याची शक्‍यता

पुणे – अम्फान वादळ विरून गेल्यानंतर आता पुन्हा मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात तो अंदमानच्या उर्वरित बेटांवर सुद्धा दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनला चालना मिळाली आणि गेल्या रविवारी म्हणजे 17 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल दहा दिवस झाले आहेत तरी सुद्धा अद्याप मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही.

Read More  रेल्वेचा निष्काळजीपणा कायम; 342 मजुरांना वाटेतच सोडून निघून गेली रेल्वे

अम्फान वादळामुळे मान्सूनचे प्रवाह प्रभावित झाले आणि त्यांनी समुद्रावरील सर्व बाष्प ओढून नेल्याने याभागात कोरडे हवामान निर्माण झाले होते त्यामुळे मान्सूनची कोणतीही प्रगती झाली नाही पण सध्या बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत असल्याने बुधवार पर्यत( 27 मे) अंदमानाच्या बेटांच्या काही भागात दाखल होण्याची चिन्हे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या