27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रचंदिगडनंतर आयआयटी मुंबईत विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह व्हीडीओ

चंदिगडनंतर आयआयटी मुंबईत विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह व्हीडीओ

एकमत ऑनलाईन

मुंबई : चंदिगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणा-या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. ही घटना ताजी असतानाच आयआयटी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयआयटी मुंबईमधील वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह व्हीडीओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कँटीनमध्ये काम करणा-या एका कर्मचा-याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील विद्यार्थिनीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणा-या कर्मचा-याने वसतिगृह १०च्या बाथरूममध्ये एका मुलीचा आक्षेपार्ह व्हीडीओ बनवला. ही घटना रविवारी रात्री घडली, अशी तक्रार तिने दाखल केली. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया, असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटकेत असणा-या आरोपीच्या फोनमध्ये कोणते फुटेज व्हीडीओ आहेत का?, याबाबत चौकशी चालू आहे. तसेच कँटीनही तत्काळ बंद करण्यात आली आहे. आता केवळ महिला कर्मचारी असतानाच कँटीन सुरू राहणार आहे.

आरोपीने ज्या पाईपचा वापर केला आहे, तो परिसर सध्या ब्लॉक केला असून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू, असेही आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई करून कँटीन बंद करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ताही सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या