नवी दिल्ली : ़ आॅस्ट्रेलियात यावर्षाच्या अखेरीस होणारी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा २०२२ सालापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमधील सूत्रांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती आणि अडचणी लक्षात घेता बोर्डाच्या सदस्यांकडून २८ तारखेला होणाºया बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते.
Read More नांदेडकरांना बुधवारी कोरोनापासून दिलासा
आयसीसीने असा निर्णय घेतला तर आयपीएल २०२०चा मार्ग मोकळा होऊ शकतो. ज्याप्रमाणे जपानमध्ये होणारी आॅलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली त्याचप्रमाणे टी-२० क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार आहे. पण ही स्पर्धा पुढील वर्षी घेता येणार नाही. कारण भारतात टी-२० वर्ल्ड कप नियोजित आहे. एका वर्षात दोन टी-२० वर्ल्ड कप खेळवणे योग्य ठरणार नाही. त्याच बरोबर अशा प्रकारे दोन स्पर्धा खेळवण्यास ब्रॉडकास्टर आणि क्रिकेट बोर्ड देखील होकार देणार नाहीत. जर भारतात आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल स्पर्धा झाली आणि पुढील वर्षी एप्रिलमध्ये २०२१ वर्ल्ड कप झाला तर दोन वर्ल्डकपचे प्रसारण शक्य करणे शक्य होणार नाही, असे स्टार स्पोर्टस्मधील सूत्रांनी सांगितले.