मजुरांना उत्तरप्रदेशात घेऊन निघालेली रेल्वे पोहोचली ओडीसामधे :रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा पडला

मुंबई : मजुरांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. यादरम्यान मजुरांना उत्तरप्रदेशात घेऊन निघालेली एक रेल्वे थेट ओडीसामध्ये पोहोचली आहे. या घटनेवरून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा पडला आहे.
२१ मे ला वसई मधून निघालेली एक रेल्वे मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जाणार होती. गाडीत बसलेले सगळे मजूर आपल्याला गावी जायला मिळणार म्हणून आनंदुन गेले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मात्र त्यांना धक्का बसला. रेल्वेचा ड्रायव्हर रस्ता चुकला आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु लक्षात येईपर्यंत ती रेल्वे ओडीसा मध्ये पोहोचली होती. आता यात नेमकी ड्रायव्हरची चूक आहे? रेल्वे प्रशासनाने त्याला त्या रूटवर जायला सांगितले होते? आता त्या मजुरांना कधी परत आणणार? आता प्रश्न अनेक आहेत परंतु उत्तर काहीच नाही. परंतु या सगळ्या गदारोळात एक गोष्ट मात्र नक्की आहे की, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनात कुठलाच ताळमेळ नाही.
Shramik Special train lost the route .Instead of reaching Gorakhpur UP it reached to Rourkela.Any comments? @RailMinIndia @PiyushGoyal @WesternRly https://t.co/U5lE8g4rjZ
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) May 23, 2020