हिंगोली/प्रतिनिधी
जिल्ह्यात दारू विक्रीसाठी मुभा देताच लोकांच्या दारू मिळण्यासाठी रांगा होतात़ वसमतला मात्र आज या रांगेत चक्क महिला दिसल्या़ यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
Read More नव्या लॉकडाऊनचे नियम कळणार
जिल्ह्यात आता दररोज दारू मिळणार असल्याने दारू घेण्यासाठी रांगाच रांगा सर्व ठिकाणी पहावयास मिळत असतानाच वसमत मध्ये मात्र पुरुषांसोबत महिला सुद्धा दारू घेण्यासाठी रांगेमध्ये उभे टाकल्याने वसमत शहरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
दारु साठी पुरुषाची रांग नेहमीच दिसत असतांना आज प्रथमच या रांगेमध्ये महिला दारू घेण्यासाठी उभे राहिल्याने सर्वत्र या बद्दल चर्चा होताना दिसत आहेत़ दरम्यान सदर महिला दारु आपल्या पतीरायासाठी खरेदी करीत होत्या की त्यांना रांगेत उभे राहुन रोजगार मिळत होता़ याची माहिती मात्र मिळु शकली नाही़ मात्र दारु साठी रांगेत लागलेल्या महिलांना पहाण्यासाठी वसमत शहरातील हौसी तळीराम या भागात सैरसपाटा मारतांना दिसत होते़