26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeराष्ट्रीयआसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग

आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग

एकमत ऑनलाईन

गॅसच्या विहिरीत भीषण आग, 4 किलोमीटरहून दिसत आहेत आगीचे लोट

आसाम : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर आज मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अजूनही आग लागाण्याचे कारण कळालेले नाही. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती दिली आहे. ही आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात तसेच त्यात पोलीस आणि सैन्याचीही मदत घेतली जात आहे.

Read More  मजुरांवरील खटले मागे घ्या, सुप्रीम कोर्टाने दिले केंद्र सरकारला आदेश

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या