28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतेल रिफायनरी स्फोटात १०० ठार

तेल रिफायनरी स्फोटात १०० ठार

एकमत ऑनलाईन

अबुजा : नायजेरियामधील इमो या दक्षिणेकडील राज्यात एका अनधिकृत रिफायनरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की त्याचा आवाज खूप लांबपर्यंत ऐकू गेला. तसेच धुराचा मोठा लोट उठलेला दिसला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा स्फोट शुक्रवारी रात्री उशिरा एगबेमा येथील स्थानिक सरकारी क्षेत्रामध्ये अनधिकृत तेल रिफायनरीमध्ये झाला. ही रिफायनरी इमो आणि नदियोच्या दक्षिणेकडील राज्यांमधील सीमारेषा आहे.

एका अधिका-याने शनिवारी सांगितले की, आतापर्यंत १० पेक्षा अधिक लोक मारले गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे. इमोमधील पेट्रोलियम संपत्तीचे कमिश्नर गुडलक ओपिया यांनी सांगितले की, एका अनधिकृत बंकरिंगच्या ठिकाणी आग लागल्याने १०० हून अधिक लोक प्रभावित झाले. ज्यांची ओळख आतापर्यंत पटू शकलेली नाही. ओपिया यांनी सांगितले की, अनधिकृत तेल रिफायनरीचा ऑपरेटर फरार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या