वाहनचालक आणि प्रवाशांसाठी कडक नियम
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने आता तीनऐवजी पाच झोनमध्ये विभागणी करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काही कॅब आणि टॅक्सी सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ओलाने वाहनचालकांना आणि प्रवाशांसाठी पाच-पाच नियम तयार केले आहे.
Read More चक्क मोरांनी केले ‘ट्रॅफिक जॅम’
वाहनचालकांसाठी तयार केलेल्या नियमांनुसार, ओला कॅब कोणत्याही कंटेनमेंट झोनमध्ये जाणार नाही. तसेच सर्व वाहनचालकांना प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य आहे आणि प्रवास सुरू करण्यापूर्वी सेल्फी काढून अॅपवर टाकणे गरजेचे आहे. वाहनचालकांना प्रवासादरम्यान मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवावे लागेल. प्रवास झाल्यानंतर गाडीमध्ये नेहमीच्या वापरात असलेला भाग सॅनिटाइज करणे आवश्यक आहे. वाहनचालक आणि प्रवासी या दोघांपैकी कोणीही मास्क घातला नाही तर प्रवास रद्द केला जाऊ शकेल.
Read More उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
ओल्याच्या प्रवाशांना प्रवास सुरू होण्यापूर्वी मास्क घालणे अनिवार्य आहे. प्रवासादरम्यान गाडीमधली एसी बंद राहतील आणि खिडक्या खुल्या राहतील, असे ओल्याने स्पष्ट केले आहे. प्रवासामध्ये दोन पेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी दिली जाणार नाही आणि दोन्ही प्रवाशांना खिडकीच्या बाजूला मागील सीटवर बसावे लागेल. या व्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंगद्वारे प्रवाशांच स्वतःचे सामना गाडीत ठेवावे लागले. तसेच ऑनलाईन पेमेंट करणे गरजेचे आहे.