19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयओमिक्रॉनमुळे कोरोनाची धास्ती कमी?

ओमिक्रॉनमुळे कोरोनाची धास्ती कमी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोविड रुग्णसंख्या वाढीचे उच्चांक मोडले. मात्र याच ओमिक्रॉनमुळे कोविड आजार हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे व्हायला मदत करेल असे तज्ज्ञांचे मत आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे झालेल्या मृत्युच्या थैमानाशी तुलना करता ओमिक्रॉन हा सौम्य लक्षणी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोविडच्या महाभयंकर संकटाची जीवघेणी गंभीरता ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कमी होत आहे, असे तज्ज्ञांकडून निरीक्षण मांडले जात आहे.

डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटची तुलना केली तर ओमिक्रॉनमुळे बाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्याची फारशी वेळ आली नाही. तसेच, तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॉन विषाणू फुफ्फुसांना डेल्टाप्रमाणे हाणी पोहोचवू शकला नाही. ओमिक्रॉन हा विषाणू कोरोनाला एक सर्वसामान्य आजारांप्रमाणे व्हायला कारणीभूत ठरु शकेल. जितक्या झपाट्याने सध्या रुग्णसंख्या वाढ दिसली, तितक्याच झपाट्याने ती खाली येईल, असे भाकीत देखील वर्तवले गेले आहे. जग जितके कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटला घाबरले होते, तितकी भीती ओमिक्रॉनच्या फैलावानंतर दिसत नाही.

कोरोना रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड सध्या मोडले जात आहेत, पण तरीही कोणत्याही देशाने पूर्ण लॉकडाऊन केलेले नाही. कारण, बहुतांश ओमिक्रॉन बाधितांमध्ये मोठी लक्षणे दिसत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीच्या आलेखाने आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली असली, तरी बहुतांश देशांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

लसींच्या प्रभावामुळे कायमचा खात्मा
मुंबईतल्या बहुतांश रुग्णांना सर्दी-खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी आहे. ही उदाहरण कोरोनाची दाहकता कमी झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे एकतर कोरोना या पुढच्या काळात साधारण सर्दी-पडशासारखा काही काळ आपल्या सोबत राहिल किंवा मग लसीच्या प्रभावामुळे त्याचा कायमचा खात्मा होईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या