मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय.
शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. कारण, एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे.
कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.