23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रदिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोदींच्या हस्ते होणार ‘समृद्धी’च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मोदींच्या हस्ते होणार ‘समृद्धी’च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शिंदे-फडणवीस सरकार जनतेला अनोखी भेट देणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये येणार आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन गेल्या १ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. पण, काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शुभारंभ लांबणीवर पडला. आता हा शुभारंभ होणार आहे.

नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील ५२० पैकी ३६० कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची ‘एमएसआरडीसी’ची योजना होती. पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचाच टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या