27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयसुनावणीच्या आदल्याच दिवशी आरोपी आफताबने जामीन अर्ज घेतला मागे

सुनावणीच्या आदल्याच दिवशी आरोपी आफताबने जामीन अर्ज घेतला मागे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातला मुख्य आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी केलेला अर्ज आता मागे घेतला आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आफताब अमीन पूनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सुनावणीच्या आदल्याच दिवशी त्याने आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.

आफताब आणि त्याची कोठडीत असतानाची वागणूक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर दुस-याच दिवशी त्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. मात्र आपण जामिनाविषयीची माहिती घेतो आणि मग अर्जावर विचार करतो, असे आफताबने सांगितले आणि त्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी २३ डिसेंबर ही तारीख दिली होती. मात्र त्याआधीच आफताबने आपला अर्ज मागे घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या