नांदेड : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीमुळे दोन महिन्यांपासून बसेसची चाके रुकली होती. आज शुक्रवारी नांदेड एसटी महामंडळ विभागाच्या ९ आगारातून ६२ बसेस धावल्या आहेत. जिल्हातंर्गत धावणा-या बसेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून तीन लॉकडाऊ न करण्यात आले. आता चौथा लॉकडाऊ न सुरु आहे. या लॉकडाऊ न काळात दुकाने अटी, शर्तीवर सुरु करण्यात आली तर शुक्रवारपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी करुन बसेस सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. बसेस सुरु करण्यापुर्वी एसटी महामंडळाच्या नांदेड विभागाने नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानकासह विविध ठिकाणच्या बसस्थानकात निर्जतुकीकरणाचे काम करण्यात आले. तसेच प्रवाशांसाठी धावणाºया बसेसची स्वच्छता करुन फवारणी करण्यात आली. बसस्थानकावर सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याकरिता वर्तुळाकार पेंटीग करण्यात आली. बसस्थानकातील बाकांची स्वच्छता करण्यात आली.
Read More कोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल: राहुल द्रविड
आज पहिला दिवस असल्याने बसेसला तुरळक गर्दी होती. बसेसमधील आसन क्षमता ४४ असून केवळ ५0 टक्के प्रवाशांचीच परवानगी आहे. त्यामुळे २२ प्रवाशांना घेवून जाण्यास आज एसटी महामंडळाने प्रयत्न केला. परंतु पहिल्या दिवशी गर्दी नसली तरी उद्या गर्दी वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केल्या जात आहे.
एसटी महामंडळाच्या नांदेड विभागातंर्गत ९ आगार असून आज शुक्रवारी आगारनिहाय बसेस धावण्याची संख्या पुढील प्रमाणे आहे. नांदेड २५, मुखेड १४, देगलूर ३, भोकर २,कंधार ६, बिलोली २, हदगाव ५, माहूर ३, किनवट २ अशा प्रकारे ६२ बसेसच्या ७२ फेºया आज झाल्या आहेत. एकूण ८५ बसेचची व्यवस्था नांदेड जिल्हातंर्गत धावण्यासाठी करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यात लॉकडाऊ नमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था मंदावली होती, व्यवहार ठप्प झाले होते. बसेच बंद होत्या. फेब्रुवारी महिन्यात नांदेड विभागास अंदाजे १६ कोटीच्या जवळपास उत्पन्न झाले होते. मात्र लॉकडाऊ नच्या काळात कोट्यावधीचा फटका नांदेड विभागाला बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.