28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रदस-यानिमित्ताने झेंडू, शेवंतीने फुलला बाजार

दस-यानिमित्ताने झेंडू, शेवंतीने फुलला बाजार

एकमत ऑनलाईन

पुणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर मार्केटयार्डातील फुलबाजारात झेंडू, शेवंती, जुई, चमेलीसह विविध फुलांची मोठया प्रमाणावर आवक झाली. फुल महोत्सवामुळे मंगळवारी राज्यभरातून १०००-१५०० गाड्यातून दोन ते अडीच हजार टन फुलांची आवक झाली. बाजारात फुलांना मागणीही मोठ्या प्रमाणावर होती. घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलोला ४० ते ८० रूपये भाव मिळाला. तर शेवंतीच्या फुलांना १५०-२५० रूपये भाव मिळाला.

यंदा नवरात्रोत्सवाला मोठा होणार असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. दस-याला फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते. झेंडूला चांगले दर मिळतात. दस-याच्या तीन दिवस आधी फूल बाजारात फुलांची आवक वाढते. झेंडूसह गुलछडी, अष्टर, कागडा या फुलांची बाजारात चांगली आवक होते. झेंडूसह चमेली आणि जुईच्या फुलांचा गजरा, तसेच पूजेला वाहण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे या फुलांनाही जादा भाव आला आहे. जुईला एका किलोसाठी दोन हजार तर चमेलीला एका किलोसाठी १४०० रुपये दर मिळाला असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेसी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. कोरोना नंतर यंदा नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. त्यामुळे फुलांचे भाव काही दिवस टिकून राहतील असा अंदाज व्यापारी अरूण वीर यांनी व्यक्त केला. यावेळी शेतर्क­यांनी दर्स­यासाठी फुले राखून ठेवली होती. यावेळी आवक चांगली आहे. तसेच मागणीही आहे. त्यामुळे ग्राहक तसेच शेतर्क­यांना परवडतील असेच भाव असल्याचेही व्यापा-यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील ट्रक पार्किंग येथे फुलमहोत्सवाची घोषणा केल्यामुळे अन्य बाजार समित्यांच्याकडे जाणारी फुलांची आवक सुद्धा पुण्याला आली. यंदा प्रचंड आवक झाली आहे. ट्रक पार्किंग फुल झाले आहे. त्याशिवाय शिवनेरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुलांच्या गाड्यातून विक्री होत आहे. भापकर पेट्रोल पंप, गंगाधाम चौकापर्यंत गाड्या आहेत. तरीसुद्धा आता फुलांना भाव चांगला राहिला.

आपटा खातोय भाव
बाजारात आपट्यालाही चांगला भाव मिळत आहे. यामध्ये २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आपट्याची गड्डी विकली जात होती. भोर, वेल्हा या भागातून अनेक शेतकरी, विक्रेते आपटा घेऊन बाजारात आले होते. दिवसभरात एक हजार ते दोन हजारापर्यंत याची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या