23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रऐन गणेशोत्सवात मुंबईत दुधाचे भाव सात रुपयांनी वाढले

ऐन गणेशोत्सवात मुंबईत दुधाचे भाव सात रुपयांनी वाढले

एकमत ऑनलाईन

मुंबई: गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. अमूल, मदर डेअरी या कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता सुटे दूधही सात रुपयांनी महागणार आहेत. मुंबईत १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. या नवीन दरांनुसार आता सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळं एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत.

अलीकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलीटर वाढ केली होती. १७ ऑगस्टपासून अमुल आणि मदर डेअरीच्या दुधात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, आता सुट्या दुधातही सात रुपयांनी वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा फटका बसणार आहे. सुट्या दुधाचे हे नवीन दर २८ फेब्रुवारी २०२३पर्यंत लागू असतील.

मुंबईत आता गुरुवारपासून सुटं दूध प्रतिलीटर सात रुपयांनी महागणार आहे. जनावराच्या चा-याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चा-याचे दर वाढले आहेत. याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोहेदेखील वाढले
घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो पोह्यांच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याची समोर येत आहे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील, अशी शक्यताही व्यापा-यांनी व्यक्त केलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या