27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रएकीकडे राज्यावर ओला दुष्काळ तर दुसरीकडे आमदारांना वेध परदेश दौ-याचे

एकीकडे राज्यावर ओला दुष्काळ तर दुसरीकडे आमदारांना वेध परदेश दौ-याचे

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्यात एकीकडे ओला दुष्काळ आहे. शेतकरी पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे मेटाकुटीला आला आहे. शेतक-यांना कितपत मदत सरकार दरबारी मिळाली, यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच एक दुस-यांविरोधात टोकाची टीका करणारे आमदार आता एकत्रच अभ्यास दौ-याच्या निमित्ताने परदेशवारी करणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्राचे सर्वपक्षीय १६ आमदार हे इस्रायल आणि दुबई दौ-यावर जाणार आहेत. राज्यातील सर्वपक्षीय १६ आमदारांचा हा अभ्यास दौरा असल्याची माहिती मिळतेय. १६ ते २५ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय आमदार अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेत ज्या विरोधकांनी सत्ताधा-यांना ‘५० खोके-५० खोके’ म्हणून घोषण देत डिवचलं होतं, त्यांच्याच मांडीला मांडी लावून हा दौरा सत्ताधारी आणि विरोधक करणार आहेच. विशेष म्हणजे राज्यात ओल्या दुष्काळाच्या संकटाने शेतक-यांना घेरलेले आहे. अशाच काळात अभ्यास दौ-याच्या निमित्ताने होणारी आमदारांची परदेश वारी चर्चेचा विषय ठरत आहे.

कोरोना महामारीमुळे आमदारांचा परदेश दौरा होऊ शकला नव्हता. अखेर या अभ्यास दौ-याच्रूा निमित्ताने १६ आमदार इस्त्र
ायल आणि दुबई दौ-यावर जणार आहेत. या दौ-यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. एकूण ९ दिवसांच्या परदेश दौ-याच्या नियोजन करण्यात आलं आहे. या दौ-यासाठी सर्वपक्षीय आमदारांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत बंब, सुरेश भोले, मेघना बोर्डीकर, यामिनी जाधव, सदा सरवणकर, राजेंद्र यड्रावरकर, कैलाश घाटगे पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत नवघारे, यशवंत माने, संग्राम थोपटे, मोहनराव हंबर्डे, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, श्वेता महाले

विधान परिषद आणि विधान सभेच्या सचिवदेखील या अभ्यास दौ-यासाठी जाणार आहे. समोर आलेल्या यादी नुसार १७ सप्टेंबरपासून या दौ-याची सुरुवात होईल. तर २५ सप्टेंबरपर्यंत हा दौरा चालेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या