24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयनामांकीत डिझायनर ईडीच्या रडारवर

नामांकीत डिझायनर ईडीच्या रडारवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांपैकी एक असणा-या सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बॉलिवूडमधील तीन नामांकित फॅशन डिझायनर्सवर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. या तिन्ही फॅशन डिझायनर्सने एका बड्या नेत्यासोबत लाखो रुपयांचा रोख व्यवहार केल्याचा, करचोरी केल्याच्या आरोपासंदर्भातील माहिती समोर आली आहे. लवकरच या तिन्ही फॅशन डिझायनर्सला चौकशीसाठी ईडीच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये बोलवले जाण्याची शक्यता एका वृत्तात व्यक्त केली आहे.

ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रितू कुमार, सब्यसाची मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा या तिघांची लवकरच ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. या तिघांनाही लवकरच ईडीकडून नोटीस पाठवून दिल्लीतील कार्यालयामध्ये चौकशी केली जणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
सब्यसाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार ही तिन्ही नावे भारतीय फॅशन जगतामधील आघाडीची नावे आहेत. बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार या फॅशन डिझायनर्सने तयार केलेले कपडे वापरतात. बॉलिवूडबरोबरच देशातील अनेक मोठी कॉर्परेट कुटुंब आणि राजकीय क्षेत्रामध्येही या तिघांची चांगलीच ओळख आहे. या तिघांचे नावे पंजाबमधील एका आमदाराशी संबंधित प्रकरणामध्ये समोर आले आहे. या आमदाराविरोधात ईडीने मनी लाँण्डरींग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यानच या तिन्ही डिझायनर्सची नावे समोर आली आहेत.

ईडीनंतर आयकर विभाग करणार चौकशी
तपास यंत्रणांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागही लकवरच पंजाबमधील या आमदाराबरोबरच या तीन फॅशन डिझायनर्स आणि त्यांच्या कंपन्यांविरोधात करचोरीचा गुन्हा दाखल करुन शकतात. आता या प्रकरणामध्ये तिन्ही डिझायनर्सची चौकशी केल्यानंतर ईडी यासंदर्भातील आपला अहवाल आयकर विभागाला सोपवले. ईडीच्या कारवाईनंतर आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.

चीनला चांगल्या प्रशिक्षणाची गरज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या