नवऱ्या मुलीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह : नवऱ्यासह 32 जणांना क्वारंटाइन
भोपाळ : लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नववधूला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला आणि त्यामुळे तिच्या नवऱ्यासह 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं. ही घटना मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये घडली आहे. नवऱ्या मुलीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
18 मे रोजी या मुलीचं लग्न झालं. सतलापुर येथे वास्तव्य करणाऱ्या तरुणाशी या मुलाचा विवाह झाला. आता या नवऱ्या मुलीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिच्या नवऱ्यासह 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं.
Read More चीन-भारत सीमावाद : भारताच्या बाजूने उभी राहणार अमेरिका
ज्या नववधूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तिला सात दिवस आधीपासून ताप येत होता. औषध घेऊनही तिला बरं वाटलं नाही. त्यामुळे शनिवारी तिची करोना चाचणी झाली. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 18 मे रोजी तिचे लग्न झाले. त्यानंतर मंगळवारी तिच्या करोना चाचणीचा अहवाल आला जो पॉझिटिव्ह आल्याचे माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना फोन करुन सांगितलं.
दरम्यान, ज्यानंतर या मुलीला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच दोन्हीकडचे कुटुंबीय, या मुलीचा नवरा, लग्न लावणारे भटजी यांच्यासह एकूण 32 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.