21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयएका महिन्यात गमावला दिड कोटी नागरिकांनी रोजगार

एका महिन्यात गमावला दिड कोटी नागरिकांनी रोजगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातली बेरोजगारीची समस्या आणखी गंभीर होत असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. जून महिन्यात देशात बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कृषी क्षेत्रात जवळपास दीड कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. मे महिन्यात हे प्रमाण ७.३० टक्के होते. शहरी भागातली परिस्थिती थोडीफार चांगली आहे. मेमध्ये शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ७.१२ टक्के होते तर जूनमध्ये हे प्रमाण ७.३ टक्के झाले आहे. सीएमआयईचे संचालक महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नसलेल्या महिन्यांपैकी रोजगाराच्या प्रमाणात झालेली ही सर्वात मोठी घट आहे.

व्यास यांनी पुढे सांगितले की, या महिन्यात जवळपास दीड कोटी रोजगार कमी झाले असून बेरोजगारीत केवळ ३० लाखांची वाढ झाली आहे. श्रमिक गटातून अन्य कामगार बाहेर पडले आहेत. कार्यरत मनुष्यबळात जवळपास एक कोटींची घट झाली आहे. ही घट मुख्यत: असंघटित क्षेत्रात झाली आहे. मान्सूनमुळे कामगारांची संख्या घटली आहे, हे चिंताजनक आहे.

सर्वांधिक बेरोजगारी हरियाणात
सर्वाधिक म्हणजे ३०.६ टक्के बेरोजगारी हरियाणामध्ये आहे. त्याखालोखाल राजस्थानमध्ये २९.८ टक्के, आसाममध्ये १७.२ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १७.२ तर बिहारमध्ये बेरोजगारीचं प्रमाण १४ टक्के आहे.

जानेवारी २०२२ मध्ये ६.५७% वर प्रमाण
२०२१ मधील मे महिन्यात बेरोजगारीचा दर ११.८४% वर पोहोचला होता. सीएमआयईच्या मते, मे २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ११.८४% वर पोहोचला होता. यानंतर घसरण झाली आणि जानेवारी २०२२ मध्ये तो ६.५७% वर आला, परंतु फेब्रुवारीमध्ये तो पुन्हा ८.१०% वर पोहोचला जो आता ७.८३% वर आहे.

बेरोजगारी अर्थव्यवस्थेचे आरोग्य दर्शवते
सीएमआयईच्या मते, बेरोजगारीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचूकपणे दर्शवतो, कारण ते देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये किती बेरोजगार आहेत हे सांगते. थिंक टँकनुसार रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात केल्याने तेजीची अपेक्षा आहे. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल. त्यामुळे स्थलांतरित मजूर शेतात परतणार आहेत.

बेरोजगारीचा दर कसा ठरवला जातो?
डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ७.८३% राहण्याचा अर्थ असा आहे की, काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक १००० पैकी ७८ कामगारांना काम मिळाले नाही. सीएमआयई दर महिन्याला १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करते आणि त्यांच्या रोजगाराची स्थिती जाणून घेते. त्यानंतर मिळालेल्या निकालांवरून अहवाल तयार केला जातो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या