31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeराष्ट्रीयदेशातील एक कोटी खाजगी वाहने होणार भंगारात जमा

देशातील एक कोटी खाजगी वाहने होणार भंगारात जमा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारी वाहनांच्या पाठोपाठ आता १५ वर्षांवरील खाजगी वाहने देखील भंगारात पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिल्लीत झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना राज्य सरकारला पाठवली जाणार असल्याचे केंद्रीय पर्यावण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.

जी व्यक्ती आपले १५ वर्षांवरील वाहन स्क्रॅप केल्याचे प्रमाणपत्र घेऊन नवीन वाहन खरेदी करायला जाईल त्यांना करात पंचवीस टक्के सूट दिली जाणार असल्याचे देखील अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले. त्यामुळे आता देशातील १ कोटी २ लाख खाजगी वाहने लवकरच रस्त्यावरून बाद होणार आहेत.

तुमच्या खाजगी वाहनाने १५ वर्षे ओलांडली असतील तर आता त्याला स्क्रॅपमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. १५ वर्षांवरील वाहने ही सामान्य वाहनाच्या तुलनेने १० ते १२ टक्के अधिक हवा प्रदूषित करतात. त्यामुळे एकूण हवा प्रदूषणात २५ ते ३० टक्क्यांची भर जुन्या वाहनाच्या वापराने पडते.

सोबत या वाहनांच्या वापराने अपघाताचा धोका हा पन्नास टक्क्यांनी अधिक वाढतो. देशातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारी वाहनांच्या पाठोपाठ आता १५ वर्षांवरील खाजगी वाहने देखील भंगारात पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिल्लीत झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना राज्य सरकारला पाठवली जाणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, जी वाहने १५ वर्षांनंतर देखील सुस्थितीत असतील, अशा परिस्थितीत वाहनमालकांना त्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल. फिटनेस सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्या वाहनांच्या वापरावर त्यांना अतिरिक्त ग्रीन टॅक्स लावण्यात येणार आहे. केंद्र सरकार तातडीने या धोरणाच्या अंमलबजावणीच्या तयारीत आहे

. केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात स्क्रॅप पॉलिसीसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. या नवीन स्क्रॅप पॉलिसीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे विदर्भ ऑटोमोबाईल संघटनेने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या