22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयलवकरच आता वन नेशन वन गोल्ड रेट?

लवकरच आता वन नेशन वन गोल्ड रेट?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्टॉक्स एक्स्चेंजच्या धर्तीवर देशात आता बुलियन्स एक्सचेंजही सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशभरात एकाच दरात सोने मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याद्वारे वन नेशन वन गोल्ड रेट हे धोरणे लागू होण्याची शक्यता आहे.

देशात बुलियन्स एक्स्चेंज मार्केट सुरु झाल्यास सोने खरेदी करणारे व्यापारी तसेच ग्राहकांना थेट या मार्केटमधूनच सोने खरेदी करता येईल. आतापर्यंत आयात केलेल्या सोन्यावर कमी-जास्त प्रमाणावर वाहतूक खर्च येत असल्याने सोन्याचे दरही वेगवेगळे असायचे. पण आता आयात प्रक्रियेत पारदर्शकता येऊन सोन्याचे दरही कमी राहण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर कमी होतील किंवा स्थिर राहतील यावर तज्ज्ञांना मात्र शंका आहे. याप्रकरणी पीएनजी सन्सचे सीईओ अमित मोडक म्हणतात, आपला देश खूप मोठा आहे, त्यामुळे सोने प्रत्यक्षात आयात झाल्यानंतर ते देशात ठराविक ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतूक खर्च, विमा खर्च तसेच होर्डिंग कॉस्ट वेगवेगळा येतो. यामुळे वन इंडिया वन गोल्ड रेट धोरण प्रत्यक्षात येणे अवघड दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या