मुंबई : अखेरच्या दोन सामन्यात तीन संघाचे भवितव्य ठरणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी तीन संघ शर्यतीत आहेत. रविवारी दुपारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात पहिला सामना रंगणार आहे तर आरसीबी आणि गुजरात यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. या दोन सामन्यानंतर प्लेऑफचा चौथा संघ कोणता हे निश्चित होणार आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे बंगळुरूमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभरात आरसीबी आणि गुजरातच्या संघाला सराव करता आला नाही. रविवारीही बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्लेऑफचे तीन संघ मिळाले आहेत. चौथ्या संघासाठी रविवारची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई अथवा आरसीबी यांच्यातील एक संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी जास्त आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. मुंबईचा रनरेट मायनसमध्ये आहे. आरसीबीचा रनरेट मुंबईच्या तुलनेत चांगला आहे. आरसीबीसमोर गुजरातचे आव्हान आहे तर मुंबईसमोर हैदराबादचे नवाब असतील.
राजस्थानलाही संधी
आरसीबी आणि मुंबईचा पराभव झाल्यास राजस्थान संघालाही प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव व्हावा लागेल. आरसीबीचा रनरेट चांगला आहे.