Saturday, September 23, 2023

एक घाव आणि दोन तुकडे?: पतीच्या डोक्यातून आरपार होत गोळी गर्भवती पत्नीला लागली

गुरुग्राम, 24 मे : ‘एक घाव आणि दोन तुकडे’ ही म्हण आपण ऐकलीच असेल. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंदूकीच्या एकाच गोळीने दोन जणांचा जीव जाता-जाता वाचला आहे. विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे. परस्परात झालेल्या भांडणानंतर एका व्यक्तीने स्वत:च्या कानशीलावर बंदूक ठेवून गोळी झाडली. पण यात गर्भवती पत्नीदेखील तिच गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने कानशीलावर गोळी चालवली आणि ती गोळी कवटीतून बाहेर पडली ती थेट पत्नीच्या मानेत शिरली. त्यामुळे तिला जोरदार दुखापत झाली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या व्यक्तीची पत्नी पलीकडे त्याच्याबरोबर कारमध्ये बसली होती. गोळी महिलेच्या मानेला लागली. सध्या या 34 व्यक्तीवर दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read More  वैद्यकीय प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळावे-छगन भुजबळ

पती बेरोजगार असल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती बेरोजगार असल्याने पत्नीशी वाद झाला होता. पोलिसांना दिलेल्या निवेदनात महिलेनं हे सांगितलं आहे. मानेसरचे डीसीपी दीपक शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी त्या व्यक्तीच्या डोक्यातून आरपार झाली आणि पत्नीच्या मानेला लागली.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की, गोळी शरीरातून बाहेर पडून दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीला लागावी ही एक दुर्मिळ घटना आहे, परंतु हे असामान्य नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पीडित व्यक्ती एकमेकांच्या अगदी जवळ असतील तेव्हाच हे घडू शकतं.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या