28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeकांद्याचे दर घसरले; शेतक-यांच्या अडचणीत वाढ

कांद्याचे दर घसरले; शेतक-यांच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र, कांद्याच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. गेल्या एक महिन्यात कांद्याच्या किमती १९ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या भावासोबत तुलना केल्यास कांद्याचे भाव जवळपास ३२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला ११ रुपये किलोचा दर मिळत आहे. कांद्याचा भाव एवढा कमी झाला आहे की उत्पादन खर्चही निघणे अवघड असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघटनांनी कांद्याला किमान २५ रुपये किलो दर देण्याची मागणी केली आहे. २५ रुपये दर न मिळाल्यास येत्या १६ तारखेपासून कांद्याचा पुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वांत मोठे कांदा उत्पादक राज्य आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्रात ४० टक्क्यांहून अधिक उत्पादन होते. त्यामुळे शेतक-यांनी कांद्याचा पुरवठा रोखल्यास देशभरात कांद्याचा तुटवडा जाणवू शकतो.

कांद्याचे उच्चांकी उत्पादन
यंदा देशभरात कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये पुरवठा वाढला आहे. पुरवठा वाढल्याने शेतक-यांना योग्य भाव मिळत नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार देशभरात ३१७ लाख टनांहून अधिक कांद्याचे उत्पादन झाले आहे. हे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ५१ लाख टनांहून अधिक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या