केंद्रीयमंत्री भारती पवार यांना घेराव, फडणवीसांच्या ताफ्यावर कांदाफेकीचा प्रयत्न
नाशिक/ अमरावती : नाशकात केंद्रीय मंत्री भारती पवार तर अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा उत्पादक शेतक-यांनी टार्गेट करून कांदा प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री भारती पवार यांना तर शेतक-यांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर कांदे फेकून मारण्याच्या तयारीत असलेल्या शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केंद्रीय मंत्री भारती पवार आणि शेतक-यांमध्ये वाद झाला आहे. कांदा दरावरून शेतक-यांनी भारती पवार यांना घेराव घातला होता. नाफेड खरेदी आणि निर्यात प्रश्नावरून शेतकरी आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यात हा वाद झाला आहे. नाशिकच्या निफाड परिसरातील ही घटना आहे. कांद्याचे दर घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतक-यांनी विविध प्रकारे आपला संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे. अद्यापही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही. दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार निफाड आणि येवला परिसरात जाऊन कांदा परिस्थितीचा आढावा घेत असतानाच त्यांच्यात आणि शेतक-यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या ताफ्यावर कांदे फेकण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणा देत असतानाच पोलिस प्रशासनाने संबंधित कार्यकर्त्यावर अटकेची कारवाई केली. पोलिसांच्या दक्षतेमुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न विफल ठरला.
शेतकरी कृषिमंत्री
सत्तारांना भिडले
याच महोत्सवाला भेट देण्यासाठी काल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आले होते. यावेळी माध्यमांशी बोलून झाल्यानंतर काही शेतक-यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना कांदा दराबद्दल प्रश्न विचारले. मी या सगळ््या प्रश्नांची उत्तरे भाषणातून देईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.