मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आता फक्त रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असतानाच, सरकारने आज, नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईत आता घरपोच दारू मिळणार आहे. मात्र, मद्याच्या दुकानांत खरेदी केली जाऊ शकत नाही. मुंबई महापालिकेसह महानगर क्षेत्रातील सर्व महापालिका रेड झोनमध्ये असतील. हे सर्व नियम आता २२ मेपासून लागू होतील.
Read More आर्सेनिकम अल्बम 30 ; रत्नागिरी जिल्ह्यात होणार सुरूवात
राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना, रेड झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत, असे सांगितले होते़ तसेच, ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते़ त्यानंतर आज, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन, अर्थात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असणार आहेत.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंदच राहील. या काळात फक्त देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू राहील.
- मेट्रो रेल्वेसेवा बंद राहणार आहे.
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, संस्था बंदच राहतील. आॅनलाइन आणि दूरस्थ शिक्षण सेवा सुरू ठेवण्यास परवानगी.
- हॉटेल, मॉल, प्रार्थना स्थळे बंद राहतील.
- परीक्षा पेपरच्या तपासणीसाठी पाच टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतात.
- आरटीओ आणि घरांचे रजिस्ट्रेशन सुरू होणाऱ
- रेड झोनमध्ये टॅक्सी आणि रिक्षा बंद राहणाऱ
- पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील़
- या आदेशापूर्वी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती, ती यापुढेही सुरूच राहतील़
- टॅक्सी, कॅब, अॅग्रीगेटर सुविधा सुरू होणार नाही. रिक्षा बंदच राहणार आहेत. चारचाकी वाहनात एक चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी आहे. दुचाकी वाहनावर एकच व्यक्तीस परवानगी़
- सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, जीम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, सभागृहे आदी सर्व ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.