20.7 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रआमदार निवासात फक्त ४२ आमदारच

आमदार निवासात फक्त ४२ आमदारच

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळात वेगवेगळ््या मुद्यांवर गोंधळ घालणारे आमदार जनतेच्या हिताच्या मुद्यावर चर्चा करत नाहीत, अशी सामान्य माणसांची तक्रार आहे. आता हेच आमदार त्यांच्यासाठी उभारलेल्या आमदार निवासात न राहता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये निवास करीत आहेत आणि आमदार निवासात पीए आणि कार्यकर्ते राहात आहेत. नागपुरात ४०३ खोल्यांचे आमदार निवास आहे. मात्र, या आमदार निवासात यंदा फक्त ४२ आमदारच राहात आहेत. बाकी आमदार हॉटेलमध्ये वास्तव्य करीत आहेत. ज्या लोकांसाठी ही भव्य इमारत उभी आहे, तेच लोक तिथे राहात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुमारे पाच एकर क्षेत्रात विस्तारलेल्या आमदार निवासात ४०३ खोल्या असून क्षमतेनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला या ठिकाणी खोली मिळेल, एवढी व्यवस्था आहे. मात्र, असे असतानाही या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे फक्त ४२ आमदार राहत आहेत. ४०३ खोल्या असतानाही फक्त ४२ आमदार इथे का राहतात आणि उर्वरित आमदार खर्च करुन हॉटेलमध्ये राहात आहेत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमदार निवासात सर्व सुविधा आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने येथील निवासस्थान, कार्यालयाची डागडुजी, रंगरंगोटीही केली जाते. परंतु येथे राहण्याऐवजी पर्यटनाला आल्याप्रमाणे हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे आमदार निवास रिक्तच राहते. अर्थात, तेथे कार्यकर्त्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. खरे म्हणजे येथील आमदार निवासात पंधरा बाय-दहा फुटाची खोली एका लाकडी पार्टिशनने दोन भागात विभागली गेलेली आहे. यात एका बाजूला आमदाराच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. तेथे एक पलंग, एक टेबल आणि एक अलमारी आहे, तर त्याच खोलीत पार्टिशनच्या दुस-या बाजूला आमदारांच्या राहण्याची सोय असून तिथे दोन पलंग आणि दोन खुर्च्या आहेत. याशिवाय सर्व सुविधा आहेत. परंतु आमदार येथे न राहता हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा खर्च वाया जात असल्याचे बोलले जात आहे.

यंदा आमदार निवासाच्या डागडुजीवर १२ कोटी खर्च
दरवर्षी हिवाळी अधिवेशन आणि त्या निमित्ताने आमदार निवासावर सार्वजनिक बांधकाम विभाग कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. गेले २ वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. त्यामुळे यावर्षी अधिवेशन आणि आमदार निवासावर झालेला खर्च जास्त आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिवेशनासाठीचा एकूण खर्च ९५ कोटी रुपयांचा असला तरी आमदार निवासातच यंदा सुमारे १२ कोटी रुपये डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. जर आपण १२ कोटींचा खर्च ग्रा धरला तर यंदा आमदार निवासात राहणा-या ४२ आमदारांपैकी प्रत्येक आमदारामागे सुमारे २ लाख ९७ हजारांचा खर्च झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या