24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूर‘मांजरा’च्या पाणलोट क्षेत्रात केवळ ६२ मिलीमीटर पाऊस

‘मांजरा’च्या पाणलोट क्षेत्रात केवळ ६२ मिलीमीटर पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : पावसाळा सुरु होऊन जवळपास पावणे दोन महिने होत आले आहेत. या कालावधीत लातूर जिल्ह्यात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही. काही भागात ढगफुटी तर काही भागात तूरळक पाऊस पडला आहे. असमान पाऊस हे यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्ये राहिले आहे. लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या मांजरा धरणाताच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत केवळ ६२ मिलीमीटर पाऊस पडल्याने या धरणात पाणीच आले नाही. परिणामी मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा व लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा हे दोन मोठे, तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प तर १३२ लघू प्रकल्प आहेत. या सर्वच प्रकल्पांत दि. १ जुलै रोजी केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. १५ दिवसांनंतर म्हणजेच १६ जुलै रोजी पाणीसाठ्यात केवळ तीन टक्के वाढ झाली आहे. सध्या या सर्व प्रकल्पांत एकुण २१.९२ टक्ेकच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
या १४२ प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त साठवण क्षमता ६९५.५३ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत १५२.४३ दशलक्षघनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यंदा जिल्ह्यात मृग नक्षत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही. कुठे हलका, कुठे मध्यम तर कुठे ढगफुटी झाली आहे. असमान पावसाचा परिणाम पेरण्यावरही झाला आहे. आर्द्रा नक्षत्रात पाऊस ब-यापैकी पडत आहे. परंतू, अद्यापही पाणी वाहिले नाही.

जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. पावणेदोन महिन्यांत या भागात केवळ ६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरा धरणात पाणीच आले नाही. या धरणाची प्रकल्पीय क्षमता १७६.९६ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या धरणात ३०.०९ दशलक्षघनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाचा पाणलोट क्षेत्रात मोठ्य पावसाची आवश्यकता आहे. कारण या धरणावर लातूरसह जवळपास २० पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत. निम्न तेरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हे धरण ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठवण क्षमता ९१.२ दशलक्षघनमीटर अहो सध्या या धरणात ४६.४२ दशलक्षघनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.

दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली
लातूर तालुक्यातील तावरजा व रेणापूर तालुक्यातील व्हटी हे दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तावरजा प्रकल्पाची प्रकल्पीय साठवण क्षमता २०.३४ दशलक्षघनमीटर, व्हटी प्रकल्पाची प्रकल्पीय साठवण क्षमता ८.२७ दशलक्षघनमीटर एवढी आहे. या दोन्ही प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली असून पाण्याची टक्केवारी शुन्य आहे. रेणापूर प्रकल्पात ८.५१, तिरु ११.३१, देवर्जन २८.०७, साकोळ १६.८७, घरणी २४.७० तर मसलगा प्रकल्पात ३०.९६ टक्के पाणीसाठा आहे. या आठही मध्यम प्रकल्पांत एकुण १४.८० टक्के पाणी आहे.

 

दुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाचाही बळी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या