रांची : झारखंडची राजधानी रांचीपासून ४० किमी अंतरावर सरगाव गावात सरकारी प्राथमिक शाळा आहे. पहिली ते पाचवीपर्यंत येथील शाळेत वर्ग आहेत. शाळेत पाच खोल्या आहेत ११४ मुलांची नोंदणी या शाळेत झालेली आहे. पण या सर्व वर्गावर फक्त एकच शिक्षक आहेत. झारखंडची ही शाळा केवळ एका शिक्षकामुळेच सुरू आहे. ११४ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे.
सिलेबेस्तर कुल्लू असे त्यांचे नाव असून त्यांचे वय ४६ वर्षे आहे. या वयात त्यांना सुट्टीची देखील आवश्यकता असू शकते. पण, त्यांना सहजासहजी सुटी मिळत नाही. ते त्यांच्या अधिकृत सुट्ट्यांपैकी निम्म्या सुट्टीचा वापर करूच शकत नाहीत. त्यांच्या उरलेल्या ह्या अशाच सुट्ट्या संपतात.
तसेच त्यांना शाळेतील सर्व मुलांना शिकवणे, त्यांच्यासाठी माध्यान्ह भोजनाची व्यवस्था करणे आणि इतर आवश्यक कार्यालयीन कामे करण्याची जबाबदारी असते.