22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रसुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करा

सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. राज्यात २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स अ­ँड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित होते.

विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये सेवाशुल्क आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नयेत, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या. असोसिएशनकडून नितीन दातार, निमेश सोमय्या, पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ, अशोक मोहोळ, प्रकाश चाफळकर यांनी मागण्या सादर केल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या