32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeराष्ट्रीय...तरच गॅसच्या किमती कमी होतील

…तरच गॅसच्या किमती कमी होतील

एकमत ऑनलाईन

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती, आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कधी कमी होतील, याकडे देशातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत याचे उत्तर दिले. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यास सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याबाबत सरकार विचार करेल, असे पुरी यांनी सांगितले.

डीएमके पक्षाचे खासदार डॉ. वीरास्वामी कलानिधी यांनी एलपीजी गॅस सिलेंडर दराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. भारतात गॅसचे दर कधी कमी होतील, असा प्रश्न त्यांनी लोकसभेत उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यास सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याबाबत विचार केला जाईल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा दर ७५० डॉलर प्रतिमॅट्रिक टन इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर निश्चित होण्यामागे विविध घटक कारणीभूत असतात. आगामी काळात देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यास मदत होईल, असेही पुरी म्हणाले.

लोकांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष
पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले की, देशात सरकार गरीब जनतेकडून होत असलेल्या मागणीबाबत संवेदनशील आहे. सौदी अरेबियात गॅसच्या दरात ३३० टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने त्या तुलनेत फार कमी दरवाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या