26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयताज महालमधील २२ खोल्या उघडा

ताज महालमधील २२ खोल्या उघडा

एकमत ऑनलाईन

आग्रा : ताजमहालमध्ये बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी भाजपच्या एका प्रवक्त्याने केली आहे. या भाजपच्या प्रवक्त्याने २२ खोल्या उघडण्यात याव्यात यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल केली आहे. तसेच याची एएसआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, ताजमहालमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावाही भाजपच्या प्रवक्त्याने या याचिकेत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ताजमहालबाबत अयोध्येतील भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका दाखल केली आहे. मी अरक ला देखील ताजमहालमधील या २२ खोल्या बंद करण्याचे कारण काय आहे? असे विचारले आहे. तसेच मी सांस्कृतिक मंत्रालयालादेखील विचारले की खोल्या बंद ठेवण्याचे खरे कारण काय आहे? सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती सांगण्यात आल्याचे भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या