22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयगुंतवणूकदार, उद्योजकांना भारतात संधी

गुंतवणूकदार, उद्योजकांना भारतात संधी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी उद्योग संघटना फिक्की आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक फोरमद्वारे आयोजित गोलमेज परिषदेत जागतिक उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना संबोधित केले. वॉशिंग्टन डीसीला भेट दिल्यानंतर सीतारमण शुक्रवारी रात्री उशिरा या ठिकाणी पोहोचल्या.

अर्थमंत्री सीतारमण सध्या जागतिक नाणेनिधी संघ आणि जागतिक बँकेने बोलवलेल्या परिषदेसाठी अमेरिकेत आहेत. यावेळी त्यांनी जागतिक पुरवठा साखळी सुधारली जात असून भारतातील सर्व गुंतवणूकदार आणि उद्योग भागधारकांसाठी संधी खुल्या असल्याचे सांगितले. भागधारकांना जागतिक पुरवठा साखळी आणि भारताच्या पारदर्शक नेतृत्वामुळे गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी आहेत, असे त्या म्हणाल्या. वॉशिंग्टन डीसीला भेट दिल्यानंतर सीतारामन शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये आल्या. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांनी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकांमध्ये सहभाग घेतला.

स्टार्टअप कंपन्यांची वेगाने वाढ
स्टार्टअप कंपन्या भारतात खूप वेगाने वाढल्या आहेत. त्यापैकी अनेक भांडवली बाजारातून निधी उभारत आहेत. यावर्षी फक्त १६ स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत. युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकनाला महत्व देणे, असे अर्थमंत्री म्हणाल्या. भारताने आव्हानात्मक काळातही डिजिटलायझेशनचा पुरेपूर फायदा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या