16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रसत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; मविआच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; मविआच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

विरोधकांकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर टीका केली आहे.

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितली. यावेळी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे कायंदे यावेळी म्हणाल्या.

आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणा-या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असे चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कायंदे म्हणाल्या. सत्तारांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संतापल्या आहेत. मुख्यमंत्री आणि
उपमुख्यमंत्री समज देतो म्हणत आहेत, पण सत्तार समज देण्याच्या पलीकडे गेले असल्याचे कायंदे म्हणाल्या.

राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जर महिलांचा अपमान करणार असतील तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. शिंदे सरकारकडे थोडी जर नैतिकता असेल तर पुढच्या २४ तासांत अब्दुल सत्तारांसह मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांचे राजीनामे घ्यावेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केले.

चुकीचे वक्तव्य करणा-या मंत्र्यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिला गप्प बसणार नाहीत. राज्यातील महिला या सावित्रीच्या लेकी असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या