नांदेड:प्रतिनिधी
मुखेड येथील कोरोनाग्रस्त महिलेचा शुक्रवारी उपचारा दरम्यान मृत्यु झाला़यामुळे नांदेडातील बळींची संख्या आठ झाली आहे़सदर महिलेवर गोवर्धनघाट स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला मात्र शेवटी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले़तर पाच नवे रुग्ण आढळयाने एकुण रूग्ण संख्या आता १४३ झाली आहे़ यामध्ये दोन हिंगोलीचे दोन रुग्ण नांदेड व मुखेडच्या महिलाचा समावेश होता.
नांदेड येथे शुक्रवार दि. २९ मे रोजी पाच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मिलतनगर, लोहारगल्ली, हिंगोली येथील दोन व मुखेड येथील चाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या १४३ इतकी झाली आहे. शुक्रवारी कोविड के अर सेंटर यात्री निवास येथील आठ व मुखेड येथील एका रुग्णास रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९९ इतकी तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३६ एवढी राहिली आहे. तसेच दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
Read More जिंदगी कैसी ये पहेली : प्रख्यात कवी योगेश यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन
मुखेड येथील कोरोनाबाधित महिलेचा वय ६१ उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती प्रशासनाकडून सांयकाळी कळविण्यात आली. गुरूवारी सायंकाळी उपचारासाठी या महिलेला दाखल केले करण्यात आले होते़ मुखेड येथील रहिवाशी असलेल्या मयत महिलेवर शुक्रवारी सांयकाळी ६ च्या सुमारास प्रशासनाकडून गोवर्धनघाट येथील स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली़परंतू स्थानिक महिला व काही नागरिकांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला़ही माहिती कळताच पोलीस अधिकारी,मनपा व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़यावेळी नागरिकांनी समजुत काढण्यात आल्यानंतर मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांं पैकी ८ जनांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ९९ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे़ उर्वरित ३६ रूग्णापै ८ रूग्ण शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले आहेत तर यात्रिनिवास कोविड सेंटर येथे १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे ४ रुग्ण उपचार घेत आहेत भोकर , बिलोली, माहुर, गोकुंदा येथे प्रत्येक १ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत़ तर उमरी येथे ४ रूग्ण दाखल करण्यात आले आहेत बाकी दोन रुग्ण मुंबई येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे,असे सांगण्यात आले़