22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeऔरंगाबाद...अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही

…अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारने शिवसेनेच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. १९८८ पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारने केंद्रातून लवकर मंजुरी आणावी.

त्याशिवाय आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. सरकारने एका महिन्यात मंजुरी मिळवावी, अन्यथा फिरू देणार नाही, असा इशाराही खैरे यांनी सरकारला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने आपल्या तिस-या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारने घेतलेला औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या नामांतराचे संपूर्ण श्रेय हे फक्त बाळासाहेबांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात हे नामांतर का केले नाही? असा सवालही खैरेंनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित केला होता. दोन दिवसांपूर्वी १४ तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या