16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रआमचे कुटुंब तणावात ; नताशा आव्हाड

आमचे कुटुंब तणावात ; नताशा आव्हाड

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘आम्ही खूप डिस्टर्ब झालो आहोत. वडिलांवर झालेल्या आरोपामुळे संपूर्ण कुटुंब तणावत आहे.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यापासून जितेंद्र आव्हाडांवर अनेक प्रकरणांवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशातच, त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने भावनिक विनंती केली आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नताशा आव्हाडने भावनिक भाष्य केले, ‘आम्ही खूप डिस्टर्ब झालो आहोत. वडिलांवर झालेल्या आरोपामुळे संपूर्ण कुटुंब तणावात आहे. मानसिक त्रास झाला आहे. महिलांसाठीच्या कायद्याचा गैरवापर करू नका’ अशी विनंती नताशाने केली आहे.

तत्पूर्वी, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी ३५४ कलम लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होऊ नये, घरे उद्ध्वस्त होतील, असेही आव्हाड यांनी म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या