22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रआमचीच शिवसेना खरी शिवसेना

आमचीच शिवसेना खरी शिवसेना

एकमत ऑनलाईन

मुंबई : तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटले की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी घेतली, कुठेही आपत्ती आली तर ते धावून गेले. एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून सत्तेमध्ये शिवसेना राहिली, असे केसरकर म्हणाले.

केसरकर यांनी म्हटले की, तुम्ही अनिल परब यांचा फोन चेक करा आणि विचारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला होता की नाही? आम्हाला माहिती आहे कोणाच्या फोनवरून उद्धव ठाकरे फोन करतात.

केसरकर यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी लढा दिला म्हणून सत्तेमध्ये शिवसेना राहिली आहे. शिंदे यांनी केले म्हणून चुकीचे आहे असे तुम्ही म्हणताय. तुम्ही एका भूमिकेसोबत राहा. लोकांमध्ये दिशाभूल करू नका. तुम्हाला वाटतं हे सगळे कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढताय, तुम्ही याआधी त्यांना भेटले का? सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका. आदराने आम्ही बोलतो तुम्ही पण आदराने बोलवा, कृपया शिवसैनिकांची दिशाभूल करू नका, असेही केसरकर म्हणाले.

दीपक केसरकरांनी म्हटले की, शिवसैनिकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणून काही शिवसेना नेते सोबत आहेत. दादा भुसे, संदीपान भुमरे, संजय राठोड माझ्यासोबत आहेत. ज्यांनी शिवसेना उभी केली ते नेते माझ्यासोबत आज पत्रकार परिषदेत आहेत. यांच्या रक्तात शिवसेना नाही का? संजय राठोड यांचे लग्न ठरले तेव्हा जेलमध्ये होते. भुमरे ५ टर्म आमदार झाले. किती वेळ जेलमध्ये गेले? याला शिवसेना म्हणतात. शिवसेना यांच्यामुळे ताठ मानेने उभी आहे, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या