19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरे हेच आमचे चिन्ह

ठाकरे हेच आमचे चिन्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष चिन्हाबाबत एक सूचक ट्विट केले आहे. नार्वेकरांनी वाघाचा फोटो ट्विट केले आहे, या फोटोमध्ये आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. आता शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही.

उद्या दुपारपर्यंत निवडणूक आयोगासमोर नव्या चिन्हासह नवे नाव सादर करावे लागणार असून नार्वेकर यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आमची निशाणी उद्धव ठाकरे असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या