28.7 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र मुलांनी वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायकलवरून स्मशानभूमीत नेला

मुलांनी वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायकलवरून स्मशानभूमीत नेला

एकमत ऑनलाईन

अंत्यसंस्कारासाठी यायला गावकऱ्यांनी नकार दिला : दारे बंद करून घेतली

कोल्हापूर –बेळगाव जिल्ह्यात करोनाची धास्ती खूपच वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांत ही धास्ती अधिक गडद असल्याचे चित्र आहे. अंत्यसंस्कारासाठी यायला गावकऱ्यांनी केवळ नकारच दिला नाही तर दारे बंद करून घेतली. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्‍यातील एमके हुबळी गावातील मुलांना आपल्या वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायकलवरून न्यावा लागला आहे.

भरपावसात मृतदेह असा सायकलवरून घेऊन जाण्याची वेळ मुलांवर आली. 70 वर्षीय व्यक्तीचा आजारपणामुळे शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या निधनानंतर करोनाच्या भीतीने व अफवांमुळे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. त्यानंतर मुलांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेह सायकलवर स्मशानभूमीत नेला.

अगदी नातेवाइकांनीही अंत्ययात्रेत सहभाग घेण्यास नकार दिला. एक दोन जणांनी मृतदेह सायकलवर बांधताना सायकल धरली इतकीच मदत केली. शेवटी मयत व्यक्‍तीच्या मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवर नेत अंतिम संस्कार केले. यावेळी घरच्या तीन व्यक्ती सोडून स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हते.

‘एमआयएम’च्या समर्थकांना ब्लॉक करणार; फेसबुक व युट्युबने उच्च न्यायालयाला दिली माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या