ChAdOx1 nCoV-19 नावाच्या या लसीची तपासणी 6 मकाऊ माकडांवर केली गेली. मानव व माकडांमधील रोगप्रतिकारक शक्ती समान असल्याने, या माकडांच्या चाचण्यांद्वारे ही लस मानवांवर कसा परिणाम करेल हे जाणून घेण्यास सक्षम असेल. मात्र मानवांमध्ये त्याचे परिणाम इतके चांगले येतील याची शाश्वती नाही.
Read More सोलापुरात कोरोनाचा वाढता उद्रेक
याबाबत बोलताना संशोधकांनी सांगितले की, कोविड-19 चा संसर्ग झालेल्या माकडांना दोन गटात विभागले गेले होते. या दरम्यान ज्यांना ही लस देण्यात आली, त्यांची प्रकृती इतरांपेक्षा चांगली होती. 14 दिवसांच्या आत त्यांच्यात Antibody तयार होऊ लागल्या. यावरून हे उघड झाले की ‘CHADOX 1 NCOV-19’ चा मकाऊ माकडांवर चांगला परिणाम झाला.
अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने अमेरिकेत ही चाचणी घेतली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मानवावरही या लसची चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल सकारात्मक आल्यावर पुढील चाचणी सुरू केली जाईल.