23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयपी. टी. उषा, इलाई राजा राज्यसभेवर

पी. टी. उषा, इलाई राजा राज्यसभेवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : धावपटू पी. टी. उषा, प्रसिद्ध संगीतकार इलाई राजा, चित्रपट कथालेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गुरु, वीरेंद्र हेगडे आणि इलाई राजा यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्यासाठी ट्वीट करत लिहिले आहे की, पीटी उषाजी या प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, नवोदित खेळाडूंना गेल्या काही वर्षांत मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

व्ही. विजयेंद्र गरू हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी निगडीत आहेत. त्यांच्या कार्यातून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटवला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असेही पंतप्रधान म्हणाले.

तिस-­या राज्यसभेच्या उमेदवाराला शुभेच्छा देत पंतप्रधानांनी लिहिले की, वीरेंद्र हेगडे जी समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची तसेच शिक्षण, संस्कृती आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, ते नक्कीच संसदीय कामकाजास समृद्ध करतील, असेही त्यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या